Health

तुम्हाला माहित आहे का ? संगीत ऐकल्याने होतात हे फायदे !

एखादे विशिष्ट गाणे ऐकून आपल्याला एखादी विशेष आठवण येते किंवा आनंद होतो किंवा आपण शांत होते हे खरोखरच अद्भूत नाही का? लोक संगीत आणि आवाज यांच्यातील फरक सांगण्याची क्षमता घेऊन जन्माला येतात. आपल्या मेंदूकडे पिच, मेलडी, लय आणि टेम्पो यासह संगीताच्या वेगवेगळ्या भागांवर प्रक्रिया करण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत.

वेगवान संगीत वास्तविकपणे आपल्या हृदयाची गती, श्वासोच्छवास आणि रक्तदाब वाढवू शकतो, हळू संगीताचा ह्याउलट परिणाम होऊ शकतो. संगीत आणि मानवी आरोग्य ह्यावर अजून बरेच संशोधन बाकी असले तरी आतापर्यंत झालेल्या संशोधनातून काही गोष्टी समोर आल्या आहेत. चला तर जाणून संगीत आपल्यावर कसा परिणाम करते.

मूड सुधारते- मेंदू आणि संगीत ह्यांवर केलेल्या संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की संगीत ऐकण्याने सर्वांगीण विकास होण्यास मदत होते, भावनांचे नियंत्रण करण्यास मदत होते आणि दररोजच्या जीवनात आनंद आणि विश्रांती मिळते. ताण कमी करते- रिलॅक्सइंग म्युझिक ऐकल्याने शस्त्रक्रियेला सामोरं जाणाऱ्या आणि निरोगी लोकांमध्ये ताण कमी करण्यास मदत होते.

चिंता कमी करते- कॅन्सर असलेल्या लोकांवर केलेल्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की नेहमीच्या उपचाराबरोबरच संगीत उपचार केल्याने त्यांच्यातील चिंतेची भावना कमी झाली आहे. व्यायाम वाढवतो – संगीत एरोबिक व्यायाम वाढवू शकतो, मानसिक आणि शारीरिक उत्तेजनाला चालना देऊ शकतो.

स्मरणशक्ती वाढवते – ताल आणि मधुरतेचे पुनरावृत्ती करणारे घटक आपल्या मेंदूत स्मरणशक्ती वाढविणारे घटक तयार करण्यात मदत करतात. संगीत ऐकण्यामुळे त्यांना अधिक तोंडी स्मरणशक्ती, कमी गोंधळ आणि चांगले लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. संगीत ऐकण्यामुळे अल्झाइमरच्या लोकांना गमावलेल्या आठवणी आठवते आणि काही मानसिक क्षमता टिकवून ठेवण्यास मदत देखील होते.

अकाली जन्मलेल्या बाळांसाठी सुखद- संगीत आणि अंगाई जीवनात्मक चिन्हे प्रभावित करू शकतात, अकाली जन्मलेल्या बालकांमध्ये ह्यामुळे आहार वर्तन आणि शोषक पद्धती सुधारू शकतात आणि शांत-सतर्क स्थितींमध्ये ते दीर्घकाळ वाढू शकतात. ह्याशिवाय म्युझिक थेरपी डिप्रेशन, मिसोफोनिया, अल्झायमर, किमो थेरपीला सामोरे जाणाऱ्या लोकांसाठी वापरली जाते.

-भक्ती संदिप

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker