Health

बीटाचे हे फायदे जाणून घेतल्यावर तुम्ही रोज बीट खाल्याशिवाय राहणार नाहीत !

बिटरुट अर्थात बीट अनेक पाककृती मध्ये वापरले जाणारे कंदमुळ आहे. बीटमध्ये आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि वनस्पती संयुगे आहेत, त्यातील काही औषधी गुणधर्म महत्वपूर्ण आहेत. चला तर जाणून घेऊ का महत्वाचे आहे बिटाचे सेवन.

बीटामध्ये आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. शिवाय कॅलरी आणि चरबी कमी असते. त्यामध्ये अजैविक नायट्रेट्स आणि पिगमेंट्स देखील आहेत, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

हृदयासाठी चांगले : बीट नायट्रेट्सनी परिपूर्ण असते, हे रक्तदाब कमी करण्यासाठी मदत करते. यामुळे हृदयविकाराचा झटका, हार्ट फेल्युअर आणि स्ट्रोकचा धोका कमी होऊ शकतो. उत्साह वाढवणे : बीटाचे सेवन ऑक्सिजनचा वापर वाढवण्यास व थकवा कमी करण्यास मदत करते. त्यामुळे उत्साह कायम राहतो.

493446908

रोगप्रतिकारक : ह्यामध्ये बीटाइलेन्स नावाचे पिगमेंट असते, ज्यात अनेक अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असू शकतात. हे दीर्घकाळापासून असलेले आजार कमी करण्यास मदत करतात. पचनास फायदेशीर : बीट्स फायबरचा चांगला स्रोत आहे, जे पाचक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. शिवाय अनेक रोगांचा धोका कमी करण्यास मदत करते.

मेंदूचे आरोग्य वाढवते : ह्यामध्ये असणारे नायट्रेट्स मेंदूत रक्त प्रवाह वाढविण्यास, संज्ञानात्मक कार्य सुधारण्यास आणि वेडेपणाचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात. वजन कमी करण्यास मदत : बीटामध्ये भरपूर प्रमाणात पाणी आणि कमी प्रमाणात कार्ब्स असतात त्यामुळे वजन कमी करण्यासाठी देखील ह्याचा फायदा होतो.

लक्षात ठेवा : बीटाचे नियमित सेवन केल्यास बीटमधील नैसर्गिक रंगद्रव्यामुळे मूत्र आणि विष्ठेचा रंग बदल होऊ शकतो. लोकांना गुलाबी किंवा जांभळा मल वा मूत्र दिसू शकतो, ज्याला बीटुरिया म्हणतात.. हे रंग बदल तात्पुरते आहेत आणि चिंतेचे कारण नाहीत.

-भक्ती संदिप
(Nutritionist in Foodvibes Grocers)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker