Marathi

‘द कपिल शर्मा’ शो सोडून कृष्णा अभिषेकला करायचे आहे हे काम ! हे वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही

द कपिल शर्मा शो बद्दल तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. प्रेक्षकांनी प्रत्येक वेळी या कार्यक्रमाला डोक्यावरती उचलून धरलेलं आहे. यातील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या कार्यक्रमामध्ये अनेक सेलिब्रिटी त्यांच्या चित्रपटांचे प्रमोशन करण्यासाठी नेहमीच येत असतात. कृष्णा अभिषेक या कार्यक्रमामध्ये एक महत्त्वाची भूमिका साकारत असतो. पण, त्याला हा कार्यक्रम सोडून एक वेगळेच काम करण्याची इच्छा असल्याचे नुकत्याच एका कार्यक्रमामध्ये त्याने स्वतः सांगितले आहे. काय आहे ही भानगड जाणून घेऊयात…..

द कपिल शर्मा शो हा कार्यक्रम कपिल शर्मा याने चालू केला होता. या कार्यक्रमाला पहिल्यापासूनच प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलेलं आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा असा कुठला कार्यक्रम इतिहासात झाला असेल असं वाटत नाही. येणाऱ्या सेलिब्रेटिंसोबतच प्रेक्षकांचं देखील दिलखुलासपणे मनोरंजन करणारा कपिल शर्मा एक हरहुन्नरी कलाकार आहे. नुकताच हा शो परत चालू करण्यात आला. आता या शोमध्ये कृष्णा अभिषेक देखील कपिल शर्मा सोबत काम करताना दिसून येतो. या शोमुळे कृष्णा अभिषेक ला चांगलेच फॅन तयार झालेले आहेत. तो या कार्यक्रमात साकारत असलेली भूमिका “सपना” प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरलेली आहे. परंतु त्याला आता या कार्यक्रमात रस राहिला नाही असे त्याने सांगितले आहे. एका कार्यक्रमात त्याने हा खुलासा केलेला आहे. परंतु त्याला हा कार्यक्रम खराखुरा सोडायचं नसून त्याने मस्करी केलेली आहे.

नुकताच सैफ अली खान त्याच्या एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या कार्यक्रमात आला होता‌. या कार्यक्रमात तो त्याच्या जवानी जानेमन या चित्रपटाचे प्रमोशन साठी आला होता. या कार्यक्रमात कृष्णा अभिषेक ने मस्करीत सैफला सांगितले की त्याला तैमुर ची नॅनी बनण्याची इच्छा असून तो तैमुर सोबतच त्याच्या वडिलांची देखील काळजी घेऊ शकतो. कृष्णा अभिषेक हे वक्तव्य ऐकून उपस्थितांना त्यांचे हसू आवरत नव्हते.

सैफ अली खानचा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झालेला आहे. या चित्रपटांमध्ये त्याच्यासोबत आलाया फर्निचर वाला आणि तब्बू महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. त्या चित्रपटाला समीक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. बॉक्सऑफिसवर देखील हा चित्रपट चांगले कलेक्शन करेल अशी आशा आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker