Bollywood

या बॉलीवूड कलाकारांच्या घड्याळांच्या किंमती ऐकून थक्क व्हाल, या अभिनेत्याची घड्याळ तर आहे इतक्या कोटींची!

लक्झरी घडाळ्यांच्या बाबतीत आपले बॉलिवूड सेलिब्रेटीही मागे नाहीत. रोलेक्स पासून ओमेगा पर्यंत ब्रँडेड घड्याळं वापरणाऱ्यांच्या यादीत अनेक बॉलिवूडकरांचा समावेश आहे. पण काही असे बॉलिवूडकर ज्यांना ब्रँडेड घडाळ्यांचं एवढं वेड आहे की त्यांना त्याची किंमत महत्वाची वाटत नाही. बॉलिवूडच्या या पाच सेलिब्रेटींच्या घडाळ्यांची किंमत ऐकून तुम्ही तोंडात बोटं घालाल. जाणून घेऊया कोण आहेत हे सेलिब्रेटी…

Loading...

ज्यूनिअर बच्चन अभिषेककडेही महागड्या घड्याळांचं कलेक्शन आहे. सध्या तो Seamaster 300 omega master हे घड्याळ वापरतो. या घड्याळाची किंमत जळपास साडेसात लाख रुपये आहे.

सध्या बॉलिवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री दीपका पदुकोणही महागड्या आणि ब्रँडेड घड्याळांची शौकीन आहे. Tissot हा दीपिकाचा आवडता ब्रँड आहे. ती नेहमी Tissotचं ‘क्लासिक प्रिंस डायमंड रोज गोल्ड वॉच’ वापरते. तिच्या या घड्याळाची किंमत 8 लाख रुपये आहे.

Loading...

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान TAG heuer या घडाळ्याच्या ब्रँडची जाहीरात करतो. शाहरुखमुळे हा ब्रँडही फेमस झाला आहे. मात्र Rolex Cosmograph हा शाहरुखचा आवडता ब्रँड आहे. तो नेहमीच व्हाइट गोल्ड डाय असलेलं Rolex Cosmograph वापरताना दिसतो. या घड्याळाची किंमत 12 लाख रुपये आहे.

महागडी आणि ब्रँडेड घड्याळ वापरणाऱ्यांच्या यादीत अभिनेता इमरान हाश्मीचं नाव सर्वात अगोदर घेतलं जातं. इमरानला ब्रँडेड घड्याळांचं भयंकर वेड आहे. त्यांच्याकडे अनेक ब्रँडेड घड्याळ आहेत. मात्र Audemars Piguet हा इमरानचा आवडता ब्रँड आहे. या घड्याळाचे आतापर्यंत फक्त 32 पिस बनले आहेत आणि भारतात हे घड्याळ फक्त इमरान हाश्मीकडे आहे. 2.1 कोटी रुपये एवढी या घड्याळाची किंमत आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close