Bollywood

टायगर श्रॉफची बहीण आहे खूपच सुंदर, सौंदर्याच्या बाबतीत बॉलीवूड अभिनेत्रींना देखील देते ट’क्क’र…

बॉलिवूडचा अ‍ॅक्शन हिरो टायगर श्रॉफने आपल्या दमदार एक्शन आणि डान्समुळे संपूर्ण भारतीयांची मने जिंकली आहेत. टायगर श्रॉफ सुपरस्टार जॅकी श्रॉफचा मुलगा आहे. टायगरचा जन्म 2 मार्च 1990 रोजी झाला होता, त्याने आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात 2014 च्या ‘हेरोपंती’ चित्रपटापासून केली ज्यामुळे टायगर रातोरात सुपरस्टार झाला. त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी त्याला चार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

टायगर श्रॉफने अल्पावधीतच चित्रपटसृष्टीत एक वेगळा ठसा उमटविला आहे. टायगर श्रॉफच्या अभिनयाबरोबरच त्याचा डान्सही खूप जबरदस्त आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. टायगर श्रॉफला वडिलांच्या साहाय्याने चित्रपटसृष्टीत एन्ट्री मिळाली होती पण त्याने स्वत: हून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. टायगर श्रॉफ बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वात हैंडसम अभिनेत्यांपैकी एक आहे.

परंतु आज आम्ही तुम्हाला टायगर श्रॉफबद्दल नाही तर त्याच्या सुंदर बहिणीविषयी बोलणार आहोत, जिचे नाव कृष्णा श्रॉफ आहे, आपल्याला सांगू इच्छितो कि कृष्णा श्रॉफ टायगरपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट केल्यामुळे ती नेहमी चर्चेत राहिली आहे. जानेवारी 1993 मध्ये कृष्णा श्रॉफचा जन्म मुंबईत झाला होता.

कृष्णा श्रॉफ हिने 2015 साली ब्लॅक शिप डॉक्यूमेंट्री फिल्म तयार केली होती. कृष्णा श्रॉफला प्रवास आणि फोटोग्राफी फार आवडते. आम्ही सांगू इच्छितो की तिने अमेरिकन स्कूल ऑफ बॉ’म्बे, मुंबई येथून शिक्षण घेतले आहे. कृष्णा श्रॉफला अजिबात अभिनय करण्याची आवड नाही परंतु चित्रपटाच्या दिग्दर्शनात तिला फार रस आहे. कृष्णाने ट्रान्सजेंडर समुदायावर एक डॉक्युमेंटरी दिग्दर्शित केली आहे, जी तिने स्वतः शू’ट केली होती.

याशिवाय टाइगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफची आवडते ठिकाण गोवा आहे, तिथे ती नेहमीच सुट्टीसाठी जात असते. याशिवाय कृष्णा फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, इंस्टाग्राम या सोशल मीडिया साइटवर अधिक अ‍ॅक्टिव्ह आहे, एकीकडे टायगर श्रॉफला बॉलिवूडमधील इंडस्ट्रीचा सर्वात लाजाळू अभिनेता म्हटले जाते, तर दुसरीकडे त्याची बहीण एकदम बिनधास्त आहे. कृष्णा आपले वैयक्तिक जीवन मीडिया पासून दूर ठेवते. ती बहुतेकदा बॉयफ्रेंडबरोबर छायाचित्रे शेअर करत असते.

कृष्णा स्पें’स’र जॉनसनशी रेलशनशिप मध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. कृष्णाला कित्येक चित्रपटांकडून ऑफरही मिळाल्या आहेत. असे म्हटले जाते की करण जोहरने तिला ‘स्टुडंट ऑफ दी इयर’ या चित्रपटात एका रोलसाठी ऑफर दिली होती. पण कृष्णाने तो रोल करण्यास नकार दिला. नंतर या रोलसाठी आलिया भट्टची निवड केली गेली आणि आलियाने यातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

अलीकडेच कृष्णाने तिची काही छायाचित्रे शेअर केली होती, जी खूप व्हायरल झाली होती आणि तिचे सौंदर्य लोकांना खूपच आवडले आहे. हि वायरल छायाचित्रे पाहता टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ खूपच आकर्षक आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

कृष्णा श्रॉफने बॉलिवूड चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले तर ती एक यशस्वी अभिनेत्री ठरेल. कृष्णा श्रॉफ खूपच सुंदर आहे, जरी तिचा भाऊ आणि वडील चित्रपटाच्या पार्श्वभूमी कडील असूनही ती या प्रसिद्धीच्या जगापासून दूर राहते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker