Health

प्रवासात उलट्या होतात ? मग करा हे सोप्पे उपाय

मोशन सिकनेस, गाडी लागणे अर्थात प्रवास करताना उलट्यांचा त्रास होणे. खूप लोकांना प्रवासाची आवड असते पण त्यादरम्यान होणाऱ्या मळमळ, उलट्या, डोकेदुखी ह्या त्रासामुळे ते प्रवास टाळतात. स्वयंपाक घरातल्या काही गोष्टींच्या मदतीने हा त्रास कमी करता येतो. चला तर जाणून घेऊया त्याबद्दल.

कुठल्या कारणांमुळे मोशन सिकनेसचा त्रास होतो म्हणजे वाहनांची गती (स्पीड), कोंदटपणा, इ. ह्यावरून मोशन सिकनेसचे तीन प्रकार आहेत. अपुरी झोप, वय, हवेची कमतरता ह्यांमुळेही प्रवासादरम्यान मळमळ-उलट्यांचा त्रास होतो. सामान्यतः स्त्रियांना आणि लहान मुलांना हा त्रास जास्त होतो.

कच्चे आले : कच्च्या आल्याचा (अद्रकाचा) साधारण 1 इंचाचा तुकडा प्रवासात सोबत बाळगावा. थोड्या थोड्या वेळाने त्याचा वास घ्यावा किंवा चघळावा. ह्याच्या तीव्र वासाने मळमळ आणि उलट्यांचा त्रास कमी होण्यास मदत होते. असे शक्य नसेल तर अद्रकाचे तेल रुमालावर टाकून त्याचा वास घ्यावा.

लिंबू : आल्याप्रमाणेच लिंबाचा वापर करता येतो. थोडया थोड्या वेळाने त्याचा वास घ्यावा किंवा लिंबू सरबत प्यावे. लवंग : लवंगेचा वास किंवा लवंग चाखल्याने मळमळीचा त्रास त्वरित कमी होण्यास मदत होते. बऱ्याचवेळा मळमळीमुळे अन्नावरची वासना उडते त्यामुळे काहीच खावं वाटत नाही अशावेळी इतर सोपे उपाय ही फायदेशीर ठरू शकतात.

क्षितिजाकडे पहा : हे कदाचित फार पुस्तकी वाटेल पण हा अत्यंत सोपा उपाय आहे. प्रवास करतोय त्या दिशेने खिडकीतून बाहेर पाहणे व्हिज्युअल रिअफरमेशन ऑफ मोशन संतुलनासाठी मदत करते. डोळे बंद करून आराम करा रात्रीच्या वेळी किंवा खिडकी नसलेल्या वाहनात डोळे बंद करून बसल्याने आराम मिळतो, शक्य असेल तर झोपावे.

ह्या गोष्टी टाळा प्रवासादरम्यान असा त्रास जाणवत असेल तर खाली बघून पुस्तक वाचणे किंवा मोबाईलचा वापर करणे टाळा. प्रवासाच्या उलट्या दिशेने बसने टाळा. असा त्रास होत असलेल्या दुसर्या प्रवाशाला पाहू नका किंवा त्यांच्याशी बोलू नका. मन शांत ठेवा. प्रवासाच्या अगोदर आणि दरम्यान तीव्र वास आणि मसालेदार किंवा चिकट पदार्थ टाळा.

-भक्ती संदिप
(Nutritionist in Foodvibes Grocers)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker