Marathi

यूट्यब वर धुमाकूळ घालणारा हा दादूस आहे तरी कोण ? मानसी नाईकलाही लागलंय याचं वेड

अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या आगरी भाषेने वेड लावणारा अवलिया म्हणजेच ‘ विनायक माळी’ हा युटूबर होय. अवघ्या काही महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या त्याच्या युटूब चॅनलने प्रचंड मोठी झेप घेतली आहे. विनायक माळीचे सध्याच्या घडीला millions मध्ये viewers बनले आहेत. त्यामुळेच तो महाराष्ट्रातला एक नामवंत युटूबर बनला आहे. Tik tok सारख्या social media माध्यमातून अनेकजण त्याच्या आवाजातील सिरीजचे डायलाॅग डब करून विनायकला प्रसिद्ध बनवत आहे.

तसेच अनेक मराठी चित्रपट सृष्टीतले अनेक अभिनेते- अभिनेत्री देखील tik tok वर व्हिडिओ बनवताना दिसत आहेत. मानसी नाईक सारखी सुप्रसिद्ध अभिनेत्री तसेच नृत्य सम्राद्नीने देखील विनायक माळीची फॅन बनली. म्हणजे मानसी नाईकला विनायक माळीचे वेड लागलीय म्हणायला हरकत नाही. अवघ्या महाराष्ट्राला तसेच संपूर्ण चित्रपट सृष्टीला वेड लावणारा विनायक माळीचा इथवर येण्याचा जीवन प्रवास झाला तरी कसा हे खुप कमी लोकांना माहित आहे. चला तर मग जाणून घेवू विनायक माळीची जीवन कहाणी.

विनायक माळीचा जन्म 22 सप्टेंबर 1995 रोजी रायगड जिल्ह्यातील पनवेल या शहरात झाला. ज्या शहराला नवी मुंबईतील एक प्रमुख शहर म्हणून ओळखलं जातं. आगरी कुटुंबात जन्मलेला विनायकचे वडिल एक सरकारी कर्मचारी आहेत. त्यामुळे विनायक खुप शिस्तप्रिय कुटुंबात चांगले संस्कार मिळाले. पण नोकरीच्या कारणास्तव विनायक माळीचे वडिल मुंबईतील ठाणे शहरात स्थायिक झाले. त्याचे शालेय तसेच, महाविद्यालयीन शिक्षण देखील ठाण्यालाच झाले. तो अजुन देखील एल.एल.बी म्हणजेच वकिलिचे शिक्षण घेतोय.

वकिली शिकत असतानाच विनायक wipro सारख्या बड्या कंपनीत कामाला लागला. पण बदलत्या शिप्ट मुळे त्याच्या तब्येतीवर परिणाम होत असत, म्हणून त्याने भेटलेली एक चांगली नोकरी सोडावी लागली. त्यानंतर त्याने काॅलेज करायचे ठरविले आणि त्यासोबत एक युटूब चॅनल उघडायच. सुरुवातीला मोबाईल मध्ये शूटिंग करून तो पोस्ट करत असत.

त्यात response तसा त्याला मिळत नसे म्हणून त्याने चॅनल बंद करायचे ठरवले. पण भावाने त्याला चॅनल डिलिट करण्यापासून रोखले आणि एक नविन कल्पना दिली. आगरी समाजातील साता समुद्रा पार देखील गाजत असलेली आगरी भाषेत व्हिडिओ बनविण्याची. पुन्हा विनायक माळी तसेच मित्रांसोबत बनवलेला एक व्हिडिओ खूप गाजला. आणि अल्पावधीतच तो संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध युटूबर बनला.

आपल्या सर्वांना खळखळून हसायला भाग पाडणारा विनायक त्याच्या व्हिडिओचे स्वतःच संकलन, दिग्दर्शन तसेच लेखन करतो. विनायकला युटूबच्या प्रसिध्दी नंतर तो एक स्टार बनला आहे आणि त्याला अनेक विनोदी भुमीकांसाठी ऑफर देखील येत आहेत. विनायकचा असाच प्रदिर्घ प्रवास चालू राहो. विनायकला पुढील वाटचालीस स्टार मराठी कडून खुप साय्रा शुभेच्छा!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker