Health

सर्दी – खोकल्याने परेशान आहात तर करा हे सोप्पे घरगुती उपाय.

पावसाळा, हिवाळा आला की सोबत आजार घेऊनच येतात. हिवाळ्यात प्रामुख्याने आढळणारा आजार म्हणजे सर्दी-पडसे. ह्यावरील उपाय देखील सर्दीसारखेच सामान्य असतात, परंतु त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही, असे का? बऱ्याच वेळा सर्दी ही व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे होते. त्यामुळे काहीही केले तरी 7-8 दिवसांच्या आधी सर्दी बरी झालेली दिसून येत नाही, परंतु असे काही उपाय आहेत जे कदाचित तुमची लक्षणे कमी करण्यास मदत करतील आणि तुम्हाला आराम देतील. चला तर पाहूया काय आहेत सर्दीवरील घरगुती उपाय.

योग्य मार्गाने नाक वारंवार साफ करा सर्दी असताना ती डोक्यात जाण्यापूर्वी नियमितपणे आपले नाक साफ करणे महत्वाचे आहे. बऱ्याचवेळा जोरात शिंकरण्याचा प्रयत्न करत असताना, तो दाब जंतु असलेला कफ आपल्या कानात परत येऊ शकते, ज्यामुळे कान दुखू शकतो. आपले नाक साफ करण्यासाठी उत्तम मार्गः आपण नाक साफ करण्यासाठी हळूवारपणे शिंकरताना एका नाकपुडीवर बोट दाबा.

Loading...

उबदार मीठाच्या पाण्याने नाक साफ करा मिठाचे पाणी चोम्बलेले नाक स्वच्छ करण्यात मदत करते, तसेच आपल्या नाकातून विषाणूचे कण आणि जीवाणू देखील काढून टाकते. कसे वापरावे मिठाचे पाणी: 1 ग्लास कोमट पाण्यात 1/4 चमचे मीठ आणि 1/4 चमचे बेकिंग सोडा मिक्स करावे. नाकात हे पाणी भरुन टाकण्यासाठी बल्ब सिरिंज किंवा नॉस्टरील इरिगेशन किटचा वापर करावा. एक नाकपुडीमध्ये मीठाचे मिश्रण टाकताना हलके बोट दाबून दुसरी नाकपुडी बंद करून ठेवा. ते पाणी काढून टाकावे. दोन ते तीन वेळा ह्याची पुनरावृत्ती करा, नंतर दुसऱ्या नाकपुडीचा उपचार करा.

उबदार रहा आणि विश्रांती घ्या जेव्हा सर्दी किंवा फ्लू होतो तेव्हा उबदार राहणे आणि विश्रांती घेणे आपल्या शरीरास रोगप्रतिकारक लढाईत उर्जा देण्यासाठी मदत करते. ह्या सर्वात शारीरिक ऊर्जा अति प्रमाणात वापरली जात असते म्हणून विश्रांती घेणे फायद्याचे ठरते.

आहार चिकन सूप
चिकन सूपने फ्लू बरा होऊ शकत नाही, परंतु जेव्हा आपण आजारी असाल तेव्हा ही एक चांगली निवड असते. भाज्या घालून बनवलेले चिकन सूप शरीरातील न्यूट्रोफिलची हालचाल कमी करू शकतो. न्यूट्रोफिल हा पांढऱ्या रक्त पेशीचा एक सामान्य प्रकार आहे. ते आपल्या शरीरास संसर्गापासून वाचविण्यात मदत करतात. चिकन सूप विशेषतः वरच्या श्वसन संसर्गाची लक्षणे कमी करण्यासाठी प्रभावी ठरते. लो-सोडियम सूपमध्ये उत्कृष्ट पौष्टिक मूल्य देखील असतात ही शरीरास हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे चिकन सूप ही प्रकृती उत्तम असताना देखील खाण्यासाठी एक चांगली निवड आहे.

Loading...

अद्रक आपल्याकडे अद्रक (आलं) अनेक शतकांपासून अनेक आजारांवर वापरला जातो. पूर्वीपासून चालत आलेला हा अत्यंत गुणकारी उपाय आहे. उकळत्या पाण्यात कच्च्या आल्याचा तुकडा खोकला आणि घशाच्या खवखवीपासून आराम देतात.

मध मधात विविध प्रकारचे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि प्रतिजैविक गुणधर्म आहेत. लिंबासह चहामध्ये मध पिल्याने घशातील वेदना कमी होऊ शकते.

लसूण लसूणमध्ये एलिसिन नावाचे रसायन असते, ज्यात अंतीमायक्रोबियल गुणधर्म असतात. आहारामध्ये लसूणाचा उपयोग सर्दीच्या लक्षणांची तीव्रता कमी करू शकतो.

व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन सी आपल्या शरीरात महत्वाची भूमिका बजावते आणि त्याचे आरोग्यासाठी बरेच फायदे आहेत. लिंबू, संत्री, द्राक्ष, हिरव्या भाज्या आणि इतर फळे आणि भाज्या याशिवाय लिंबू हे व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. ताज्या लिंबाचा रस गरम चहामध्ये मधासोबत घेतल्यास कफ कमी करण्यात मदत करू शकतो. नेहमी लिंबू पाणी पिणे देखील फायद्याचे ठरू शकते.

-भक्ती संदिप (Nutritionist in Foodvibes Grocers)

Loading...

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close