Marathi

चित्रपटात काम मिळविण्यासाठी विवेक ओबेरॉयला काय करावं लागलं होतं पहा ?

विवेक ओबेरॉय बाॅलीवूडच्या अनेक विनोदी चित्रपटातील भुमीकांसाठी प्रसिद्ध असलेला एक अभिनेता. जो आपल्या सर्वांना कधी पोट धरून हसायला भाग पाडतो, तर कधी हिरोगिरीने प्रेमात पाडतो असा नैसर्गिक अभिनय संपन्न असलेला अभिनेता. त्याने साकारलेला क्रिश 3 तसेच रक्त चरित्र मधील अफलातून खलनायकाच्या भुमीकेचे कौतूक करावे तेवढे कमीच आहे.

Loading...

त्यासोबत सर्वांना हे देखील माहित आहे की विवेक बाॅलीवूडच्या एक नामवंत कलाकार सुभाष ओबेरॉय यांचा मुलगा आहे. आश्चर्याचा धक्का म्हणजे विवेकने वडिलांची कधीच नाही मदत घेतली उलट त्यांच्याशी चित्रपटात कोणालाच सुभाष ओबेरॉय या नावाचा खुलासा न करता बाॅलीवूड मध्ये पदार्पण करेन याची पैज लावली. आणि कामाला लागला.

चित्रपटात काम मिळविण्यासाठी त्याने स्वतःचे नाव आधी बदललं. फक्त विवेक आनंद हे नाव लावत असत. एक दिवस राम गोपाल वर्मांकडे काम मिळविण्यासाठी गेला तेव्हा राम गोपाल वर्मांनी सांगीतलं ‘तु खुप माडर्न आणि चाॅकलेट बाॅय वाटतोय तुला काम नाही मिळू शकत. या चित्रपटासाठी एका झोपड पट्टीतल्या बिघडलेल्या एका मुलाच्या भुमीकेची गरज आहे.

हे ऐकून विवेकने 15 दिवसांची मुदत मागितली आणि झोपड पट्टीतल्या इलाक्यात तो पंधरा दिवस राहिला. त्यांची भाषा, त्यांचे वागणे, त्यांचे राहणीमान याचा अभ्यास केला. आणि पंधरा दिवसा नंतर त्याच वेषात राम गोपाल वर्मांना भेटायला टपोरी वेषात गेला. त्याचे बदलेले अवतार आणि भुमीके साठी केलेली मेहनत पाहून राम गोपाल वर्मांनी विवेकला कंपनी या चित्रपटात काम करण्यासाठी संधी दिली आणि त्यानंतर विवेकने राम गोपाल वर्मांना सांगितले तो सुभाष ओबेरॉय यांचा मुलगा आहे. तसेच वडिल सुभाष ओबेरॉय यांना नेहमीच अभिमान वाटत राहिला.

विवेकने कंपनी नंतर अनेक एकापेक्षा एक चित्रपटात काम केले त्याची यादी पुढीलप्रमाणे.

Loading...

●पीएम नरेंद्र मोदी

●ओमकारा

●मस्ती

●काल

●साथिया

●युवा

●रक्त चरित्र

●क्रिश 3

●ग्रांड मस्ती

Loading...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close